आनंदित रोहित वर्मा म्हणाले की, “भगवान कृष्णाने मला ज्या सर्व संधी दिल्या त्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी आहे. मी डॉ. पॅडी शर्मा यांचेही रन वे वर त्यांनी केलेल्या सादरीकरणाबद्दल आभार मानतो त्यांनी खरोखरचं सर्वांना मंत्रमुग्ध केले.”
रोहित वर्मा हे २०१९च्या ह्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा शोचे खरे स्टार होते; त्यांनी आपला चमकदार संग्रहच नव्हे तर जबरदस्त फॅशन शो देखील सादर केला. या कार्यक्रमासाठी आयएसीएच्या चेअरपर्सन डॉ. श्रीमती पॅडी शर्मा, आयएसीए चेअरमन श्री अनी अग्निहोत्री आणि फॅशन इव्हेंटचे को-ऑर्डिनेटर किरण अग्निहोत्री उपस्थित होते. आयएसीए ही अटलांटामधील भारतीयांची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी नफा रहित संस्था आहे आणि गेली २३ वर्षे ते फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करीत आले आहेत.
महोत्सवाचा हा अध्याय हा दिवसभर सांस्कृतिक क्रियाकलापांनी भरलेला होता आणि अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि स्थानिक राजकारण्यांसह संपूर्ण जॉर्जियामधील ३००० पेक्षा जास्त लोकांनी येथे उपस्थिती दर्शविली होती.
No comments:
Post a Comment