Thursday, 4 July 2019

जोश फौंडेशनच्या परफॉर्मंन्सने केले प्रेक्षकांना भावुक



बॉम्बे वेस्टच्या रोटरी क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे धडकन यांनी अपंगत्वाच्या आसपास असलेल्या अडथळ्यांना तोडले. 'स्पेशली ऍबल्ड मिरॅकल' नावाच्या उपशीर्षकाने, ४०० संस्थांवरील विशेषतः निपुण मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये प्रतिभा शोध, नृत्य, अभिनय आणि फॅशन शोमध्ये १०० पेक्षा अधिक मुलांनी प्रदर्शन केले. डॉ. जयंत गांधी आणि ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट देवांगी दलाल यांच्या नेतृत्वाखाली जोश फाऊंडेशन यांनी पुलवामा हल्ल्यांला बळी पडलेल्या शाहीदांना भावनिक श्रद्धांजली देत नृत्य सादर केले ह्यामध्ये ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट देवांगी दलाल यांनी देखील उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता आणि ह्या सादरीकरणासाठी उपस्थित प्रेक्षकांकडून त्यांना पसंतीची थाप मिळाली.

देवंगी दलाल सांगतात की, "आम्ही लोकांना हे जाणून देऊ इच्छितो की, ही मुले असहाय्य नाहीत. त्यांची शारीरिक स्थिती त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अडथळा नाही!" शेवटी, या खास मुलांच्या चेहऱ्या वरील आनंद आणि हसणे आम्हाला 'अक्षम' लेबलच्या समाजाच्या गैरसमजांच्या व्याख्येबद्दल प्रश्न विचारतात.

No comments:

Post a Comment