एम्पल मिशन हि एक सामाजिक संस्था आहे. जिचा परोपकारी
कार्यात नेहमीच सहभाग असतो. एम्पल मिशनने नुकतेच मुंबईमधील आरे कॉलनीतील एका
आदिवासी गावासाठी एक आरोग्य शिबीर आयोजित केली होती. आपल्या समाजातील गरीब
वर्गाच्या विकासात सुधारणा करण्यासाठी त्यांनी रहिवास्यांना प्राथमिक मदत किट, सॅनिटरी
पॅड्स आणि साबण वितरित केले. त्यांनी हाताची स्वछता उत्तम आरोग्यासाठी खुप
महत्व्वाची आहे हे पटवून देण्यासाठी एक जागरूकता सत्र देखील आयोजित केले होते. ही
एक अशी मूलभूत आवश्यकता आहे जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जाते. "नियमित
आरोग्य तपासणी शिबिरासह येथील आदिवासी राहिवासींसाठी अशा प्रकारच्या आरोग्य
उपक्रमांची त्वरित आवश्यकता आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही त्याकडे अजून लक्ष
देऊ." असे मत डॉ. अनील काशी मुरारका - संस्थापक, एम्पल
मिशन यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment